मिरज :
सततच्या पावसामुळे शहरातील प्रमुख चौकांतील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याच्या निषेधार्थ व रस्त्याच्या दूरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपाइं आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांनी खड्ड्यांमुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात झोपून आंदोलन करत मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. या आंदोलनाने सवचि लक्ष वेधले.
शहरातील सर्वच प्रमुख चौकांची दूरवस्था झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून खङ्ख्यांत पावसाचे पाणी साचले आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून, महापालिकेकडून रस्त्यांची दुरूस्त करणे अपेक्षित आहे. मात्र, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चौकात रस्त्यावर तळे साचून राहिल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. याच्या निषेधार्थ मंगळवारी आनंदा हत्तेकर यांनी स्वतः पावसाच्या पाण्यात व खड्ड्यांमध्ये झोपून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. लवकरच रस्त्यावरुन गणरायाचे आगमन होणार आहे. खड्ड्यांमुळे मिरवणुकीला अडथळा निर्माण झाला आहे. खड्यांमुळे त्रास झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल करत हत्तेकर यांनी सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी केली. दोन दिवसात महापालिकेने रस्ते दुरुस्त केले नाहीत तर उग्र आंदोलन करू असा इशाराही दिला.








