कोणत्याही स्थितीत शेतजमिनी देणार नाही : आंदोलकांचा पवित्रा
प्रतिनिधी /सांगे
काही दिवसांपूर्वी नियोजित आयआयटीच्या परिसरात 144 कलम लागू केल्याने आयआयटीविरोधी आंदोलन ठप्प पडले होते. मात्र आयआयटीविरोधी आंदोलकांचा विरोध कायम असून सोमवारपासून आंदोलकांनी धरणे आंदोलनाला प्रारंभ केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या शेतजमिनी देणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
सांगे तालुक्मयातील प्रस्तावित आयआयटी गोवा कॅम्पसला शेतकऱयांच्या विरोधानंतर प्रशासनाने गेल्या मंगळवारी नियोजित प्रकल्पाच्या सीमेपासून 200 मीटरच्या आंत कलम 144 लागू केले. त्यानुसार कोठार्ली ग्रामच्या सीमांकन केलेल्या जागेपासून 200 मीटरच्या आंत पाच किंवा अधिक लोकांना एकत्र येण्यास आणि जमाव करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून काही दिवस आंदोलन थंड होते. मात्र सोमवारपासून विरोधकांनी सांगे बचाव समिती स्थापन करून त्या बॅनरखाली दांडो येथे धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे .
आयआयटी हा शैक्षणिक प्रकल्प प्रथम लोलये आणि त्यानंतर शेळ मेळावली व त्यानंतर सांगे येथे होऊ घातलेला आहे. सांगे येथे हा प्रकल्प उभारण्यासाठी स्थानिक आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी उत्सुकता दाखविली. मात्र सुरुवातीपासूनच या प्रकल्पाला काही शेतकर?dयांनी विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. सर्वेक्षणाला विरोध होऊ लागल्याने सरकारने 144 कलम लागू केले. काही लोकांना सांगे पोलीस स्टेशनमध्ये बोलावून अटक करण्यात आली, तर अजून काही लोकांना पोलिसांनी बोलावून चौकशी करणे चालू ठेवल्याने शेतर?dयानी दांडो येथे एका घराच्या प्रांगणात धरणे आंदोलनाला सुरुवात करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे .
जमिनी सांभाळून ठेवण्यासाठी आंदोलन
यावेळी पत्रकारांकडे बोलताना रुपाबाई चारी म्हणाल्या की आमच्या जमिनी सांभाळून ठेवण्यासाठी आम्ही धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत. आम्हाला कोणी बोलावलेले नाही आमदार सांगतात तो खोटारडेपणा असून आम्ही त्यांना जनतेचे हित जपण्यासाठी आमदार केले होते. परंतु आज त्यांनी आयआयटी आणण्यासाठी आमच्या शेतावर पाय ठेवला आहे. आमची मुले शेतात गेल्यास त्यांना पोलीस पकडून नेतात, असा दावा त्यांनी केला. आगुस्ता फर्ना?डिस म्हणाल्या की, मी 60 वर्षे शेती व्यवसाय केला. माझ्या 7 मुलांना शेती करूनच मोठे केले. त्यावेळी कोणी माझ्या मुलांना सरकारी नोकरी देण्याचा प्रयत्न केला नाही. आज फळदेसाई आमच्या शेतात आयआयटी प्रकल्प आणू पाहत आहेत. आमच्याकडे सर्व कागदोपत्री व्यवहार असताना ते म्हणतात की, शेतकर?dयांकडे काही नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वताः शेतकर?dयांकडे संवाद साधावा व समस्या जाणून घ्याव्यात. आम्हाला आमची शेती पाहिजे, प्रकल्प नको, असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करू नये
दत्ताराम गावकर म्हणाले की, शेतकर?dयांना विश्वासात घेऊनच मंत्री फळदेसाई यांनी सर्वेक्षण करायला हवे होते. आताही आम्हाला घेऊन त्यांनी जमीन दाखवावी. उगाच शेतकर?dयांकडे काही कागदोपत्री पुरावे नाहीत असे सांगून मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करू नये. आम्हाला आयआयटी नकोच आहे, असे ते म्हणाले . धरणे आंदोलनाला सुमारे 25 लोक उपस्थित होते. हे आंदोलन न्याय मिळेपर्यंत चालूच राहणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक दिवशी सांगेतील शेतकरी वेगवेगळय़ा ठिकाणी बैठका घेऊन पुढील रणनीती ठरवत आहेत. आयआयटीच्या उभारणीसाठी आपली सुपीक जमीन संपादित करू देणार नाही, असा दावा करत या भागातील शेतकऱयांनी गेल्या सोमवारी या प्रकल्पाच्या सीमांकनाची प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न केला होता.
आयआयटीसाठी शेतीची तसेच इतकी जमीन का, असा सवाल करत शेतकऱयांनी शेवटपर्यंत विरोध करण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे.









