सिंधुदुर्गनगरीत भाजपा ओरोस मंडळाच्या वतीने पाकिस्तान मुर्दाबादचे नारे
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
पेहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपा ओरोस मंडळाच्या वतीने ओरोस फाटा येथे पाकिस्तानचे झेंडे पायदळी तुडवून व जाळून निषेध नोंदविण्यात आला.यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणाही देण्यात आल्या. काश्मीर मध्ये पेहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणाचा मृत्यू झाला त्यात महाराष्ट्रातील 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेने संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात असून भाजपा ओरोस मंडळाच्या वतीनेही तीव्र संताप व्यक्त करत भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. ओरोस फाटा येथे हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानी झेंडे पायदळी तुडविण्यात आले व त्यानंतर ते जाळण्यात आले. यावेळी भाजपा ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत,ओरोस सरपंच आशा मुरमुरे, सुप्रिया वालावलकर,अमित भोगले, उदयकुमार जांभवडेकर, छोटू पारकर,गौरव घाडीगावकर, हार्दिक शिगले ,दिनेश जैतापकर, सुनील जाधव ,उल्हास पालव, उदय पालव,शुभम राठिवडेकर,आदी भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.








