पंढरपूर प्रतिनिधी
Jalna Lathi Charge : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर (अंतरावली ता अंबड जिल्हा जालना) येथे पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला आहे. घटनेच्या निषेधार्त पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सरकारचा मराठा समाजाकडून निषेध करण्यात आला.
अंतरावली ता अंबड जिल्हा जालना याठिकाणी 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून आंदोलनस्थळी लाठीचार्ज व गोळीबार करण्यात आला आहे यामध्ये अमानुषपणे आंदोलकांना मारहाण करण्यात आली आहे. आंदोलक रक्तबंबाळ झाले होते. याचे पडसाद सर्वत्र महाराष्ट्रभर पसरले आहेत ठिकठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम झाला असून एसटीच्या फेऱ्या काहि ठिकाणी बंद ठेवण्यात आल्या आहेत.