बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक
कोल्हापुरात या घटनेचा ठिय्या आंदोलन करत निषेध
कोल्हापूर
बांगलादेशात सत्ता बदलानंतर गेल्या काही महिन्यांपासून हिंदू मंदिरे, बौद्ध विहारे आणि नागरिकांवरील हल्ले वाढत आहेत. या विरोधात सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे. आज बांगलादेशात होणाऱ्या हल्ल्याचा राज्यभरातून तीव्र विरोध करत आंदोलन होत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी कार्यालय समोर सकल हिंदू समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी इस्कॉन टेम्पलच्या वतीने भजन करत घटनेचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात सकल हिंदू समाजासह भाजप शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूची तात्काळ मुक्तता व्हावी अशी मागणी निवेदनद्वारे यावेळी करण्यात आलीय.








