आपच्या कार्यकर्त्यांकडून चन्नम्मा चौकात आंदोलन
बेळगाव : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संचालक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करत आप कार्यकर्त्यांकडून रविवारी चन्नम्मा चौकात आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला. यानंतर धरणे आंदोलन करण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. केजरीवाल यांनी गोरगरिबांसाठी अनेक विकासकामे केली आहेत. देशाच्या राजकारणात अमुलाग्र बदल केला आहे. अशा व्यक्तिला द्वेषाच्या राजकारणातून अटक करण्यात आली आहे. त्यांना धैर्य मिळावे यासाठी एकदिवसीय आंदोलन करून उपहास सत्याग्रह आयोजित करण्यात आला असल्याचे आपचे जिल्हाध्यक्ष शंकर हेगडे यांनी सांगितले. यावेळी अरविंद बेल्लद, एम. के. सय्यद, जुनेद सय्यद यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.









