ऑनलाईन टीम/तरुणभारत
Savitribai Phule Pune University: सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या (Shrimant Dagdusheth Ganpati Trust) पुढाकाराने श्री गणेश अथर्वशिर्ष (Ganesh Atharvashirsha) यावरील सर्टीफिकेट कोर्स सुरु करण्यात आला आहे. पण या कोर्सला विरोध होताना दिसत आहे. प्राध्यापक हरी नरके यांनी या कोर्सला विरोध केला आहे.
दरम्यान, अथर्वशिर्ष कोर्सला वयाची मर्यादा नाही, विद्यार्थ्यांना हा कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक देखील मिळणार आहे. भारतीय संस्कृती जागतीक पातळीवर नेण्याचं काम यातून होत असल्याचा दावा विद्यापीठाने केलाय.
अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाला विरोध
‘पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्न ही सनातनी मंडळी रंगवत आहेत. हे धोकादायक पाऊल आहे,’ असं हरी नरके म्हणाले. तर ब्राह्मण महासंघाने उर्दू प्रार्थना चालते तर अथर्वशीर्ष का नको, असा सवाल विचारला आहे. दरम्यान हा कोर्स कम्पलसरी नाही, ज्यांना नकोय त्यांनी जॉईन करू नये. आराधना धार्मिक कशी असू शकते? असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
काय आहे अभ्यासक्रमात
भारत सरकारने नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबलं आहे. या कोर्सच्या माध्यमातून मंत्रांचं महत्व, शारिरीक आणि मानसिक फायदे लोकांपर्यंत पोहचले जाणार असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. शिक्षणाला अध्यात्म तसंच ज्ञान आणि विज्ञानाची जोड देत योग्य सांगड घालणं महत्वाचं असल्याचं विद्यापीठाने सांगितलं आहे. अभ्यासक्रमात एक प्रश्नमालिका देण्यात आली असून त्याची उत्तरं दिल्यानंतर सर्टिफिकेट दिलं जाणार आहे.