रत्नागिरी :
शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे चालवल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केल़ी गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुऊवारी सकाळी या प्रकाराचा पर्दाफाश केल़ा पुण्यातील दोन तऊणींच्या मदतीने नेपाळी महिला हा वेश्या व्यवसाय चालवत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आह़े संशयित नेपाळी महिलेविऊद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आह़े
गीता छबी थापा (38, ऱा मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी, मूळ ऱा नेपाळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नेपाळी महिलेचे नाव आह़े स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे एमआयडीसीतील एका घरामध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसाना मिळाली होत़ी या प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी गुन्हे अन्वेषण शाखेने 18 सप्टेंबर रोजी सकाळी एक डमी गिऱ्हाईक आतमध्ये पाठवून दिले. तसेच पोलिसांचे पथक एमआयडीसी परिसरात दबा धऊन बसले होत़े
संबंधित घरामध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची खातरजमा होताच गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकल़ा येथे दोन तऊणी व एक नेपाळी महिला अन्वेषण पथकाच्या हाती लागल्य़ा या महिलांची चौकशी केली असता दोन तऊणी पुणे येथील असल्याचे समोर आल़े तसेच नेपाळी महिला गीता थापा या दोन तऊणींच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे समोर आल़े पोलिसांनी 2 हजार 500 ऊपये रोख व एक मोबाईल घटनास्थळावऊन पोलिसांनी हस्तगत केल़ा
वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या नेपाळी महिलेविऊद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शबनम मुजावर, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर, दीपराज पाटील, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, स्वाती राणे, शितल कांबळे, कॉन्स्टेबल पाटील व पोलीस नाईक दत्ता कांबळे यांनी केल़ी
शहर व लगतच्या परिसरात देहव्यापाराचे वाढते प्रकार
मागील काही वर्षात रत्नागिरी शहर व लगतच्या परिसरात वेश्या व्यवसायाचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत़ शहरातील प्रतिष्ठित अशा ओसवालनगर येथे पोलिसांनी कारवाई केली आह़े तर नुकतेच खेडशीतील एका लॉजवर वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होत़ा सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने सुसंस्कृत अशा रत्नागिरी शहराला एक प्रकारचा डाग लागल्याचे बोलले जात आह़े..








