रत्नागिरी :
अमेरिका आणि चीनमध्ये मधमाशांचे विष गोळा केले जाते. हे विष १ कोटी रुपये किलो या भावाने विकले जाते. दुर्धर आजारावर हे विष गुणकारी आहे. भविष्यात खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने अशाप्रकारे विष गोळा करता येते का, याचा राज्य शासन गांभीर्याने विचार करीत आहे, अशी माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.
‘एव्हरेस्ट’ उद्योग समूहाच्या सहकार्याने व राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकाराने महाबळेश्वर येथे ‘मधुबन’ हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते अलिकडेच करण्यात आले.








