शहरातील जुना बुधगाव रस्ता येथील प्रकार
सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
सांगली
घरात असलेल्या तिजोरीत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा चार लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने तिजोरीचे लॉकर डुप्लिकेट किल्लीने उघडून लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संगिता संतोष शेलार (रा. मेंडगुळे प्लॉट, शिंदे मळा, जुना बुधगाव रस्ता, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही चोरी शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या पूर्वी घडली असल्याचा अंदाज आहे. याबाबत माहिती अशी, फिर्यादी संगीता शेलार या एका पॅकिंग कारखान्यात मजुरीचे काम करतात. भिशीचे पैसे ठेवण्यासाठी त्यांनी कपाटातील लॉकर किल्लीच्या सहाय्याने उघडला. त्यावेळी कोणीतरी तिजोरी डुप्लिकेट चावीचा वापर कऊन आतील ८२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख तीन लाख ५० हजार रुपये चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली.
सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या चोरीबाबत पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. कारण ही चोरी माहितगार आणि फिर्यादी यांच्या घरात येणाऱ्या कोणीतरी केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे त्यानुसार पोलीस तपास करत आहे.
Previous Articleप्रतापगडावरून जपानपर्यंत शिवज्योतीचा ऐतिहासिक प्रवास!
Next Article डंपरच्या धडकेने दुचाकीवरील








