खासदार शेट्टर यांची सूचना : केंद्राकडून 100 कोटी मंजूर
बेळगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवस्थानला केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून 100 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पर्यटन विभागाच्या डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिक्स टुरिस्ट सेंटर टू ग्लोबल स्केल प्रकल्पाअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली. यल्लम्मा देवस्थानच्या विकासासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे. या निधीचा योग्य विनियोग व्हावा यासाठी खासदार शेट्टर यांनी मंगळवारी बैठक बोलाविली होती. या बैठकीला पर्यटन विभागाचे अधिकारी व यल्लम्मा मंदिर व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाविकांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करून मूलभूत सुविधा पुरविण्याच्या सूचना केल्या.









