बेळगाव : शास्त्रीनगर येथील समर्थ भवनमध्ये अखंड हनुमान चालिसा कार्यक्रमाचे भक्तांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. हनुमान चालिसा परिवार आणि रामभक्तांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुनी स्वामी भंडारी यांची उपस्थिती लाभली. यावेळी स्वामीजींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुनी स्वामी भंडारी बोलताना म्हणाले, 500 वर्षानंतर सर्वांना हा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. रामभक्त हनुमान यांची आराधना करण्याच्या माध्यमातून अध्यात्म्य साधण्याची एक संधी आहे. प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीने या उपक्रमामध्ये भाग घ्यावा व हनुमान चालिसा पठण करावे, असे आवाहन त्यांनी केले. दि. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. भक्तांनी हनुमान चालिसा पठण करून प्रभू श्रीरामांच्या चरणी भक्तीभाव अर्पण करण्यात उपयोगी ठरणार आहे. या उपक्रमासाठी नोंदणी करून अखंड हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आवाहन त्यांनी केले. यावेळी कृष्ण भट्ट यांनी प्रास्ताविक भाषण केले. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी अनेक जणांनी योगदान दिले आहे. या योगदानामुळेच राम मंदिर उभारणे शक्य झाले असून हा सोहळा सर्वांनी एकत्र येऊन साजरा करावा. हनुमान चालिसा पठणमध्ये सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी हनुमान चालिसा सेवा परिवाराचे अध्यक्ष जेठाभाई पटेल, महापौर शोभा सोमणाचे, उपाध्यक्ष राजशेखर पाटील, राम भंडारी, राम जमानी, राजेश्वरी संबरगीमठ, संतोष वादवा, गणेश चौगुले, डॉ. सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
Previous Articleबेळगावच्या सायकलपटूंचे अनोखे साहस
Next Article मराठी भाषेचे संवर्धन आवश्यक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









