बेळगाव ; केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्यावतीने प्रयोग शिशीर व अविन्या शिशीर 23 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांमधील नाविन्यता व प्रयोगशीलतेला वाव देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अशोक शेट्टर यांचे स्वागत प्रा. डॉ. बसवराज कटगेरी यांनी केले. प्रा. एस. बी. कुलकर्णी व एस. बी. यादवाड यांच्या प्रयत्नातून 60 हून अधिक प्रकल्प शिबिरात मांडण्यात आल्याचे प्राचार्यानी सांगितले. कुलगुरू डॉ. अशोक शेट्टर यांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यतेचे कौतुक केले. त्यांनी केलेल्या संशोधनाचा पुढील आयुष्यात नक्कीच उपयोग होईल असे त्यांनी सांगितले. य् ाा प्रदर्शनात अनेक कॉलेजच्या 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रा. ऐश्वर्या चौकीमठ यांनी सूत्रसंचालन केले.
Previous Articleडॉ. सोनाली सरनोबत यांनी बेळगावच्या समस्यांकडे वेधले लक्ष
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









