अडथळ्यांची पारख करत वाटचाल : इस्रोची मोठी चिंता दूर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची चांद्रयान-3 मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य प्रकारे काम करत आहे. इस्रोच्या म्हणण्यानुसार प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील पहिला अडथळा यशस्वीपणे पार केला आहे. चंद्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करत असताना मार्गात आलेले उंचवटे आणि खड्डे चुकवत प्रज्ञान रोव्हर अचूकपणे वाटचाल करत असल्याने इस्रोची मोठी चिंता दूर झाली आहे.
23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरलेल्या रोव्हरने सुमारे 100 मिमी खोली असलेले चंद्राचे विवर पार केले. रोव्हरच्या या कामगिरीने इस्रोचे वैज्ञानिक अधिक उत्साहित झाले आहेत. त्याचबरोबर प्रज्ञान आपल्या मार्गातील प्रत्येक खडकाळ अडथळ्यांवर मात करून आपले संशोधन चालू ठेवले आहे. तथापि, रोव्हरच्या ऑपरेशनला मर्यादा आहेत. चंद्रावरील या हालचालींचे अपडेट्स नॅव्हिगेशन पॅमेऱ्याद्वारे काढलेल्या फोटोंमधून इस्रोला प्राप्त होत आहेत. मात्र, विक्रम लँडर चित्र पाठवतो तेव्हा जास्तीत जास्त पाच मीटरपर्यंत डिजिटल एलिव्हेशन मॉडेल तयार केले जाऊ शकते. याचा अर्थ असा की जेव्हा रोव्हरला हालचाल करण्यास सांगितले जाते तेव्हा ते जास्तीत जास्त पाच मीटरचे अंतर पार करू शकते. सदर मार्गाचाही एक फोटो इस्रोकडून जारी करण्यात आला असून त्यात स्पष्टपणे चाकांच्या खुणा उठलेल्या दिसत आहेत.
आपल्या मार्गात आलेल्या आव्हानांना न जुमानता रोव्हरने आपला मार्गात आलेला पहिला अडथळा म्हणजेच ख•ा यशस्वीरित्या दूर केल्यामुळे इस्रो टीमला दिलासा मिळाला. रोव्हरच्या हालचालींना 24/7 टेलिमेट्री आणि टेलिकम्युनिकेशन्सची अनुपलब्धता आणि सूर्याचा सतत मागोवा घेण्याची गरज यासारख्या मर्यादांचा सामना करावा लागतो, असे चांद्रयान-3 प्रकल्प संचालक पी वीरामुथुवेल म्हणाले. सहकाऱ्यांच्या अथक परिश्र्रमाशिवाय आणि समर्पणाशिवाय हे शक्मय झाले नसते. विशेषत: नेव्हिगेशन, गाईडन्स अँड कंट्रोल, प्रोपल्शन, सेन्सर्स या टीमने महत्त्वाचे योगदान दिले आहे. याशिवाय यूआरएससीचे संचालक एम शंकरन आणि इस्रोच्या उच्च व्यवस्थापनाचा पाठिंबा कायम होता. परिणामी, प्रत्येक हालचाली दरम्यानचा टर्नअराउंड वेळ अंदाजे पाच तासांचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच प्रकल्प संचालकांनी रोव्हरच्या प्रगतीवर आणि चांगल्या परिणामांच्या संभाव्यतेवर विश्वास व्यक्त केला.









