उज्जैन येथील आंतरराष्ट्रीय संमेलनात प्रा. पं. तेजराज किंकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
कर्मकांडाला दूर केल्याशिवाय ज्योतिष शास्त्राची प्रगती शक्मय नाही, असे मत प्रा. पंडित तेजराज किंकर यांनी व्यक्त केले. उज्जैन येथील विक्रम विश्व विद्यालयामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये वक्ता या नात्याने ते बोलत होते.
विक्रम विश्वविद्यालय हे मध्य प्रदेशातील जुन्या विश्वविद्यालयांपैकी एक आहे, जेथे ज्योतिषी शास्त्र हा विषय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिकविला जातो. 370 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ज्योतिषांनी या संमेलनामध्ये भाग घेतला होता. प्रा. तेजराज किंकर यांनी सायन पद्धतीने पृथ्वीचा बदललेला कल आणि ग्रहांच्या अंशात्मक बदलाविषयी त्याचबरोबर या घटनेच्या परिणामांविषयी चर्चा करताना ज्योतिष शास्त्राकडे वैज्ञानिकदृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे ठामपणे सांगितले.
बुवाबाजी आणि भीतीच्या माध्यमातून जाचकांना लुबाडण्यापेक्षा येणाऱ्या पिढीकडे आपण काय सुपूर्द करून जात आहोत, आपले संशोधनात्मक कार्य काय आहे, जुन्या जाणत्या लोकांनी केलेल्या कामाचा कित्ता गिरविण्यापेक्षा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याची गरज असल्याचेही प्रा. किंकर यांनी नमूद केले.









