मुंबई :
30 जून 2023 अखेरच्या तिमाहीत किर्लोस्कर इंडस्ट्रिजने 94 कोटी रुपयांचा करपश्चात एकत्रित नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या स्तरावर पाहता किर्लोस्कर इंडस्ट्रिजचा नफा 9 टक्के इतका घटलेला पाहायला मिळाला आहे. याच तिमाहीत मागच्या वर्षी कंपनीने 102 कोटी रुपयांचा एकत्रित नफा प्राप्त केला होता. याच कालावधीत कंपनीने 1518 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न मिळवले आहे. जे मागच्या वर्षी समान अवधीत 1513 कोटी रुपये इतके उत्पन्न होते.









