मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालामधून माहिती : पण पुढच्या वर्षी कंपन्या असणार नफ्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कमाईच्या दृष्टीने हे वर्ष अमेरिकन कंपन्यांसाठी चांगले राहणार नसल्याचे संकेत आहेत. या संदर्भात मॉर्गन स्टॅनले (मॉर्गन स्टॅनली) ने इशारा दिला आहे की एस अॅण्ड पी 500 कंपन्यांच्या नफ्यात यावर्षी 16 टक्क्यांनी घट होणार आहे. तथापि, पुढील वर्षी (2024) अमेरिकन कंपन्यांची कमाई चांगली राहणार असल्याचेही विश्लेषकांचे म्हणणे आहे. फेडरल रिझर्व्हचे धोरण अधिक अनुकूल होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
मायकल विल्सन यांच्या नेतृत्वाखालील मॉर्गन स्टॅनलेच्या विश्लेषकांच्या टीमने एका अहवालात सांगितले आहे, की पुढील वर्षी अमेरिकन कंपन्यांचा नफा 23 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. वॉल स्ट्रीट बँकेनेही याबाबतीत म्हटले आहे, की एस अॅण्ड पी कंपन्यांचे इपीएस 2023 मध्ये 195 डॉलरवरून 185 डॉलरपर्यंत घसरून पुढील वर्षी 239 डॉलरपर्यंत वाढू शकते.
मॉर्गन स्टॅनलेने 2024 मध्ये एस अॅण्ड पी निर्देशांक 4,200 पातळी गाठण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर 2023 अखेरचे लक्ष्य 3,900 वर ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी निर्देशांक 4,282.37 वर बंद झाला.मॉर्गन स्टॅनलेनुसार पाहता, काही सकारात्मक बातम्या, फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेतील बदलाची अपेक्षा असून याचा फायदा होतो का ते आगामी काळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









