शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील प्राध्यापक
डिगस : प्रतिनिधी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील प्राध्यापक डॉ. श्रीचक्रधर मुंगल, शरीरक्रियाशास्त्र यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियोजन मंडळावर(Planning Board) सदस्य म्हणून व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केले आहे. प्राध्यापक डॉ. श्रीचक्रधर मुंगल सध्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञन विद्यापीठाच्या प्रथम वर्ष अभ्यास मंडळाचे (Board of Studies) अध्यक्ष, तसेच विद्या परिषद (Academic Council of MUHS) सदस्य , वित्त व लेखा समिती (Finance and Accounts Commitee of MUHS) चे सदस्य या पदांवर देखील कार्यरत आहेत.या यशाबद्दल प्राध्यापक डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांचे सर्व वैद्यकीय अध्यापक व समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे









