प्रतिनिधी
बांदा
माजी विद्यार्थी प्रा .स्वागत केरकर यांनी फिजिक्स सारख्या कठिण विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल बांदा तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत सिंधुदुर्गातील विद्यार्थी ही कठिण परीक्षा उत्तीर्ण होताना दिसतात. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी सेट परिक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. या प्रसंगी प्रशालेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतांना प्रा केरकर म्हणाले की जिवनात यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करा. योग्य दिशेने वाटचाल केली तर अशक्य गोष्ट ही साध्य करू शकाल. प्रा.केरकर सध्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहेत. प्रा.केरकर यांनी उत्तम यश प्राप्त करून विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे असे गौरवोद्गार प्राचार्या एम एम सावंत यांनी काढले. या प्रसंगी पर्यवेक्षक श्री नंदू नाईक सर, प्रा.काळे सर, वसकर मॅडम, फाटक सर, प्रा.सौ सावळ मॅडम व इतर शिक्षक उपस्थीत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









