कुडाळ –
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यायाचा माजी विद्यार्थी व याच महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान शाखेच्या प्राणीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक सागर हेमंत कुडाळकर राज्यस्तरीय सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. या यशाबरोबरच त्यांनी गेल्यावर्षी नेट परीक्षेतही यश मिळविले होते. सागर कुडाळकर कुडाळ गणेशनगर येथील राहिवासी आहेत.संत राऊळ महाराज महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर शाखेमधील प्राणीशास्त्र विषयाचे त्यांनी शिक्षण घेतले. याच महाविद्यालयात वरिष्ठ विज्ञान शाखेमधे प्राणीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत.गेल्याच वर्षी CSIR-UGC च्या केंद्रीय स्तरावरील नेट परीक्षा ते उत्तीर्ण झाले.तसेच जून २०२५ मधे झालेल्या राज्यस्तरीय सेट पतीक्षेला बसले होते. या परीक्षेचा निकाल अलीकडेच लागला असून त्यातही ते उत्तम श्रेणीने उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशस्वी भरारीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.स्मिता सुरवसे, क.म.शि.प्र. मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.कुडाळ येथील रिक्षा व्यावसायिक हेमंत कुडाळकर यांचे सागर हे सुपुत्र होत.









