Prof. in Degwe. Kishore Desai conferred Doctoral Degree by University of Mumbai
स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मराठी नाटकातील नायक.संकल्पना आणि स्वरूप चिकित्सक अभ्यास या विषयावर डॉक्टरेट देण्यात आली.सध्या देसाई सर श्रीमती टी.एस.बाफना कनिष्ठ महाविद्यालय मालाड पश्चिम, मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यांच्या डेगवे गावी माध्यमिक विद्यालय डेगवे येथे झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते वडिलांकडे मुंबईला आले आणि डॉक्टरेट मिळविण्यापर्यंत प्रगती केली. आपली नोकरी, शिक्षण वगैरे सर्व सांभाळून ते आपल्या इतर छंदात व्यस्त असतात.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे,नाटकात काम करणे,गावच्या डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघा या संस्थेच्या कामकाजात सहयोग देणे अशा बऱ्याच कामामध्ये ते व्यस्त असतात.डेगवे गावात त्यांच्या या डॉक्टरेट बद्दलच्या बातमीने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
सावंतवाडी / प्रतिनिधी









