मालवण । प्रतिनिधी
स.का.पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवणचे प्रा.हसन खान हे भूगोल विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले.महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सेट परीक्षा आयोजित केली जाते. 15 जून 2025 रोजी घेण्यात आलेल्या 40 वी सेट परीक्षा घेण्यात आली होती.त्याचा निकाल दिनांक 30 ऑगस्ट रोजी लागला. या परीक्षेसाठी 1 लाख 10 हजार 412 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सदर परीक्षेचा निकाल 6.69 टक्के लागला असून फक्त 6 हजार 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.प्रा. हसन खान हे पर्यावरण व भूगर्भ विषयाचे अभ्यासक असून करवंटी व बांबू पासून विविध वस्तू तयार करतात.यासाठी त्यांचा विकल्प हा ब्रॅण्ड प्रसिद्ध आहे. तसेच अनेक विषयांवर त्यांचे संशोधन लेख प्रसिद्ध झाले असून अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









