Prof. from Sateli Bhedshi. come Fast to death started under the leadership of Baburao Dhuri at the centre
आठवड्यानंतर साखळी उपोषण झाले आमरण उपोषण.
प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणास आज सोमवार पासून सुरुवात करण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण साटेली भेडशी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ , (उ. बा. ठाकरे) गटाच्या शिवसैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सकाळी लोकार्पण कार्यक्रम पार पडला होता. मात्र लोकार्पणा नंतरही या नूतन इमारतीत आवश्यक आरोग्य सुविधा सुरू न केल्याने या सुविधा सुरू होईपर्यंत साखळी उपोषण सुरू होते परंतु याकडेही जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधीक्षक यांनी दुर्लक्ष करीत मागणी मान्य न केल्याने सुरू असलेल्या उपोषणाचे रूप बदलून सोमवार पासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.जोपर्यंत या नूतन इमारतीत आवश्यक आरोग्य सुविधा प्रत्यक्ष सुरू करीत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. या उपोषणादरम्यान उदभवणाऱ्या सर्व परिस्थिती ला जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधीक्षक हेच जबाबदार राहतील अशी प्रतिक्रिया बाबुराव धुरी यांनी दिली.
(साटेली भेडशी प्रतिनिधी)