प्रतिनिधी/ बेळगाव
ज्ये÷ साहित्यिक प्रा. बी. एस. गवीमठ यांच्या साहित्यावर रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजता कन्नड साहित्य भवन येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दोन सत्रात त्यांच्या साहित्यावर विविध मान्यवर विचार मांडणार आहेत.
केंद्रीय साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. सर्जु काटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. एच. बी. राजशेखर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या कार्यक्रमात डॉ. बसवराज जगजंपी उपस्थित राहणार आहेत. प्रा. बी. एस. गवीमठ यांचा मित्रपरिवार व त्यांच्या विद्यार्थ्यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा. बी. एस. गवीमठ यांच्या समग्र साहित्यावर या कार्यक्रमात चर्चा होणार आहे. चर्चासत्रानंतर कारंजीमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी व नागनूर रुद्राक्षीमठाचे श्री अल्लमप्रभू स्वामीजी, साहित्यिक डॉ. गुरुदेवी हुल्याप्पण्णावरमठ, बेळगावचे यापूर्वीचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.









