फेब्रुवारी महिन्यातील आकडेवारीचा समावेश
नवी दिल्ली : भारताच्या उत्पादन क्षेत्रातील वाढ फेब्रुवारीमध्ये चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर येऊन पोहोचली आहे, अशी माहिती एका मासिक सर्वेक्षणातून देण्यात आली आहे. हंगामी समायोजित एस अॅण्ड पी ग्लोबल इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) फेब्रुवारीमध्ये 55.3 वर होता. हा आकडा जानेवारीच्या 55.4 पेक्षा कमी आहे. तथापि, फेब्रुवारीच्या पीएमआय डाटाने सलग 20 व्या महिन्यात एकूण ऑपरेटिंग परिस्थितीत सुधारणा दर्शविली आहे. पीएमआयच्या भाषेत, 50 पेक्षा जास्त स्कोअर म्हणजे निर्देशांकाचा विस्तार होत आहे, तर 50 पेक्षा कमी स्कोअर आकुंचन दर्शवितो.
बुधवारी जाहीर झालेल्या सर्वेक्षणानुसार, जरी आंतरराष्ट्रीय विक्रीतील वाढ लक्षणीयरीत्या कमी झाली असली तरी भारताच्या उत्पादन उद्योगाने आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत उत्पादन आणि नवीन ऑर्डरमध्ये मजबूत वाढ ठेवल्याची माहिती आहे.
रोजगारात वाढ अयशस्वी : लिमा
सर्वेक्षणानुसार, 98 टक्के लोकांनी रोजगारात कोणताही बदल केला नाही. एस अॅण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्राच्या संयुक्त संचालक पोलिआना डी लिमा यांनी सांगितले की, रोजगार वाढीचा वेग अयशस्वी राहिला असल्याचे सांगत त्यांनी कंपन्यांकडे सध्याच्या गरजांसाठी पुरेसे कामगार असल्याचेही कारण दिले आहे.









