नवी दिल्ली :
छोट्या कंपन्यांपासून ते लक्झरी ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर सध्या लक्ष केंद्रित करत आहेत. सध्याला देशात इलेक्ट्रिकच्या दुचाकीसह चारचाकी वाहनांची मागणी वाढते आहे. त्यामुळे दररोज अनेक इलेक्ट्रिक वाहने बाजारात दाखल होत आहेत. लक्झरी कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यू आपले इलेक्ट्रिक बीएमडब्ल्यू आय5 मॉडेल पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये सादर करू शकते. ताज्या माहितीनुसार, बीएमडब्ल्यू कंपनीने आपल्या आय5 मॉडेलचे जर्मनीमध्ये उत्पादन सुरू केले आहे.
कंपनीने कारमध्ये सोयीसुविधा देताना ग्राहकांना आराम आणि सुरक्षितता देण्याचा प्रयत्न केला आहे. केबिनच्या आत, कंपनीने 14.9-इंचाची टचक्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. 12.3-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरदेखील प्रदान केला आहे.
वेगाच्या बाबतीत, 5.7 सेकंदात 0 ते 96 किमी प्रतितास वेग नवी कार घेऊ शकते. बीएमडब्ल्यू आय5 ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 475 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असे कंपनीने दावा केला आहे.