नवी दिल्ली :
इलेक्ट्रीक स्कूटर बनविणारी कंपनी अॅथर एनर्जी यांच्या 450 अपेक्स या स्कूटरचे उत्पादन भारतामध्ये घेण्यास सुरुवात झाली आहे. कंपनीचे सहसंस्थापक स्वप्नील जैन यांनी ही माहिती दिली आहे.
अॅथर एनर्जी कंपनीचा उत्पादन कारखाना तामिळनाडूतील होसूर येथे आहे. या स्कूटरची किंमत 1 लाख 89 लाख रुपये इतकी असणार आहे. या जानेवारी महिन्यात सदरची गाडी लाँच करण्यात आली होती. या गाडीमध्ये 3.7 किलो वॅटची बॅटरी देण्यात आली असून 2.9 सेकंदात 40 किलोमीटर प्रती तास इतका वेग ही गाडी घेऊ शकणार आहे.
एकदा चार्ज केल्यानंतर सदरची दुचाकी 157 किलोमीटरचे अंतर कापू शकणार आहे. तासाला 100 किलोमीटर इतका वेग ही गाडी देऊ शकणार आहे. दोन मोडमध्ये ही गाडी सादर केली आहे.









