नवी दिल्ली : मुळची अमेरिकेतील कंपनी प्रॉक्टर अँड गँबल (पी अँड जी)येत्या काळात भारतात निर्मिती प्रक्रियेसाठी 2 हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचे सांगितले जात आहे. गुजरातमधील साणंद येथे वैयक्तिक आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्मितीसाठी सदरची गुंतवणूक वापरली जाणार असल्याचे कळते. पी अँड जी इंडियाचे सीईओ एल. व्ही. वैद्यनाथन यांनी गुंतवणूकीबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्यासोबत याबाबतीत चर्चा त्यांनी केली आहे. कंपनीचे भारतात एकंदर 8 प्लांट आहेत. सदरच्या नव्या प्रकल्पाच्या कार्याला साधारणपणे पुढील काही वर्षात प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या प्रकल्पामुळे आगामी काळात अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. साणंदमध्ये उत्पादने बनवून ती भारताबाहेर निर्यात करण्यावर कंपनीचा भर आगामी काळात राहणार आहे.
Previous Articleराज्यपालांनी केले मंत्र्याला ‘बाद’
Next Article आगामी 5 वर्षात स्टार्टअप 147 युनिकॉर्न होणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









