मुख्य आयुक्तांची घेतली भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सेंट्रल टॅक्स विभागाचे मुख्य आयुक्त मिलिंद गवई तसेच ऑडिट विभागाचे आयुक्त दिनेश पांगुरकर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
जीएसटी भरताना उद्योजकांना येणाऱ्या समस्या आयुक्तांसमोर मांडण्यात आल्या. तसेच चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सी. सी. होंडदकट्टी, उपाध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, सहसचिव राजेंद्र मुतगेकर, सदस्य संजय पोतदार, विनित हरकुनी, स्वप्निल शहा, अनिल कुंदप यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.









