आमदार, सरकारने लक्ष द्यावे : राजेश दाभोळकर
म्हापसा : साळगाव मतदारसंघात सध्या वीज, पाणी, रस्ते या तीन मूलभूत सुविधाही व्यवस्थित मिळत नाही आहेत. आमदार केदार नाईक विकास साधण्यासाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले मात्र आज साळगाव मतदारसंघात फेरफटका मारल्यास येथील दुर्दशा दिसून येते. सतत खंडित वीज पुरवठा, रस्त्यांची दुर्दशा आणि पाण्याचा पुरवठा होत नाही. आमदार व सरकारने लक्ष देण्याची मागणी वेरेचे समाजसेवक राजेश दाभोळकर यांनी दिली. आज प्रत्येकजण संधीसाधू बनले आहेत. निवडून आल्यावर त्यांना लोकांचे काही पडलेले नसते. येथील पाण्याचा प्रश्न आजपर्यंत कोणीच सोडवू शकलेला नाही. केदार नाईक आमदार होऊन वर्ष झाले मात्र कोणताच विकास झालेला नाही. मंत्री, आमदार फक्त आश्वासने देऊन दिवस पुढे ढकलत असल्याचा आरोप दाभोळकर यांनी केला.
किती म्हणून कळ सोसावी
रस्त्यांवर खोदकाम कऊन ठेवले आहे. त्यामुळे पावसात रस्ते ख•sमय झाले असून गाडी चालवणे जिकरीचे बनले आहे. गावातील लोकांना पाणी नसताना मेगा प्रकल्पांना परवानगी कशाला? ते पूर्णत: बंद होणे गरजेचे आहे. बेकायदेशीररित्या मेगा प्रकल्पांना परवानगी दिली जाते त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. येथील वीज, पाणी, वीजची समस्या सुटत नसून आम्ही किती म्हणून कळ सोसावी, असे राजेश दाभोळकर म्हणाले.
साळगाव प्रकल्पात बाहेरील कचरा नकोच
साळगाव प्रकल्प पाच वर्षांपूर्वी सुऊ झाला मात्र आता ते मडगावचा कचरा येथे आणतात. त्यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. आमदार केदार नाईक याबाबत लोकांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. आता मुख्यमंत्री किती सहकार्य करतात हे पहावे लागणार आहे. माजी मंत्री सुरेश पऊळेकर असताना साळगाव मतदारसंघात चौफेर विकास झाला होता. त्यानंतर अधोगती सुऊ आहे. येथील युवकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत असल्याचे दाभोळकर यांनी सांगितले.









