तालुक्यातील पंचायत कामकाजासंबंधी घेतली माहिती
खानापूर : प्रोबेशनरी पंचायतराज अधिकारी अभिनव जैन यांची खानापूर तालुका पंचायत आणि तालुक्यातील विविध ग्राम पंचायती, मनरेगा तसेच अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना भेटी देवून कामकाजाची माहिती घेतली. यावेळी खानापूर ग्रा. पं. च्या वतीने श्रीकांत सपटला यांनी स्वागत करून तालुका पंचायतीच्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी संचालक रुपाली बडकुंद्री, विजयकुमार कोथिन, एस. सी. जालगेरी, विकास अधिकारी राजू तळवार, सागरकुमार बिरादार, नेत्रावती एम. डी. ता. पं. चे कर्मचारी उपस्थित होते. पंचायतराज विभागात आयएस अधिकारी अभिनव जैन हे रुजू झालेले आहेत. पंचायतराज व्यवस्थेतील माहिती घेण्यासाठी गुरुवारी खानापूर तालुका दौरा केला. यावेळी त्यांनी खानापूर तालुका पंचायतीला भेट देवून कामकाजासंबंधी माहिती घेतली. त्यानंतर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी, हलशी यासह इतर ग्राम पंचायतीना भेट देवून ग्राम पंचायतीतील कामकाजाची माहिती घेतली. त्यांनतर मनरेगा कामाबाबत माहिती घेऊन कामगारांशी चर्चा केली. हिरेहट्टीहोळी येथील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेला भेट देवून शैक्षणिक उपक्रमाबद्दल माहिती घेतली. त्यानंतर माध्यान्ह आहाराचा आश्वाद घेतला. तसेच विद्यार्थ्यांशी हितगूज करून विद्यार्थ्यांत रमून गेले.









