वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सीबीएसईने 12 वीच्या परिक्षांचे संभाव्य वेळापत्रक घोषित केले आहे. 17 फेब्रुवारीपासून या पारीक्षेचा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. या परिक्षेला भारताच्या सर्व राज्यांमधून विद्यार्थी बसतात. तसेच 26 अन्य देशांमधील विद्यार्थीही ही परीक्षा देतात. ही परीक्षा 15 जुलैपर्यंत चालण्याची शक्यता आहे. सीबीएससी मंडळाने या परीक्षेचे नेमके वेळापत्रक प्रसिद्ध केलेले नाही. मात्र, सर्वसाधारणपणे, बुधवारी जे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे, त्यात फारसे परिवर्तन होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. फेब्रुवारीपासून प्रारंभ होणाऱ्या या परीक्षेला यावेळी विक्रमी 45 लाख विद्यार्थी बसतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.









