वृत्तसंस्था/ लॉसेनी
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2023 च्या हॉकी प्रो लिग पुरुष आणि महिलांच्या स्पर्धेचे अनावरण 6 डिसेंबर रोजी अर्जेंटिनातील सँटीयागो डेल इस्ट्रो येथे होणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची ही पाचवी प्रो लिग हॉकी स्पर्धा पुन्हा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या आगामी स्पर्धेत भारतीय महिला संघाचा तसेच आयर्लंडच्या पुरुष संघाचा पहिला सामना अनुक्रमे चीन आणि नेदरलँड्स बरोबर होणार आहे. पाचव्या प्रो हॉकी लिग स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक तसेच सामन्यांची ठिकाणे आणि वेळ गेल्या एप्रिलमध्येच हॉकी फेडरेशनने जाहिर केले होते. पाचव्या हॉकी प्रो लिग स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार अर्जेंटिनातील सँटियागो डेल पोट्रो येथे 6 ते 11 डिसेंबर दरम्यान, त्यानंतर अर्जेंटिनातील ब्युनोस आयरिस येथे 14 ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान, भुवनेश्वर आणि राऊरकेला-भारत येथे 3 ते 25 फेब्रुवारी दरम्यान, बेल्जियममधील अँटवेर्फ येथे 22 मे ते 2 जून दरम्यान, ब्रिटनमध्ये 1 ते 12 जून दरम्यान आणि नेदरलँड्समधील अॅमस्टरडॅम आणि युट्रेची येथे 22 ते 30 जून 2024 दरम्यान सामने होणार आहेत.
या स्पर्धेच्या पदोनती आणि पदावनत्ती नियमानुसार पहिल्यांदा पाचव्या प्रो लिग हॉकी स्पर्धेत गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या हॉकी नेशन्स चषक स्पर्धेतील पात्र ठरलेल्या दोन संघांना संधी देण्यात आली आहे. भारतीय महिला संघ आणि आयर्लंडचा पुरुष संघ या नियमानुसार पाचव्या प्रो लिग हॉकी स्पधेंत स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडच्या महिला संघाने आगामी प्रो लिग हॉकी स्पर्धेतून माघार घेतल्याने त्याच्या जागी भारतीय महिला संघाला स्थान मिळाले आहे.









