वाळपईचे ‘धनयां देंवचारा’ प्रथम
मडगाव : मडगावच्या भांगराळे गोंय अस्मिताय तर्फे चौथ्या सुमती रामा नाईक स्मृती उत्सवी हौशी कोंकणी नाट्या स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवारी मडगाव रवींद्र भवनात झाले. प्रथम पारितोषिक मासोर्डे-वाळपई येथील कला आविष्कारने सादर केलेल्या ‘धनयां देंवचारा’ नाटकाला प्राप्त झाले. ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक अॅड. उदय भेंब्रे यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. पहिल्या बक्षीसाचे स्वरूप रू. 12 हजार व चषक असे होते. गोव्याच्या विविध भागात 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल पर्यंत सादर करण्यात आलेल्या उत्सवी हौशी कोंकणी नाटकाचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता. स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक रू. 7 हजार व चषक दाग-फोंडा येथील श्री सरस्वती नाट्यामंडळाने सादर केलेल्या ‘रथोत्सव’ नाटकाला प्राप्त झाले तर तृतीय पारितोषिक रू. 5 हजार व चषक आकें-मडगाव येथील श्री राम साई हौशी कला मंडळाने सादर केलेल्या ‘ओ बाय’ नाटकाला प्राप्त झाले होते. उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी रू. 3 हजार कारापूर-तिस्क, साखळी येथील श्री विठ्ठल मंच सांगातीने सादर केलेल्या ‘धनयां देवचारा’, केरी-सत्तरी. बेळेवंश युवक समितीने सादर केलेल्या ‘देवा तूं पाव’ आणि सांतईनेज-पणजी येथील वाठारेश्वर महिला नाट्या मंडळाने सादर केलेल्या ‘आंगश्यो मांगश्यो’ नाटकाला प्राप्त झाले होते या वेळी वैयक्तिक बक्षिसांचे वितरणक करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला कमलाकर म्हाळशी, भांगराळे गोंय अस्मितायचे अध्यक्ष राजेश प्रभू, संस्थापक अध्यक्ष डॉ. पुर्णानंद च्यारी, युगांक नाईक तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
वैयक्तिक बक्षिसांचे विजेते पुढील प्रमाणे – उत्कृष्ट दिग्दर्शन : प्रथम-विनय विष्णू गांवस (धनयां देंवचारा) कला आविष्कार मासोर्डे-वाळपई, द्वितीय-दीपराज खेडेकार (रथोत्सव), श्री सरस्वती नाट्यामंडळ, दाग-फोंडा. तृतीय-संदीप मडिवळकर (ओ बाय), श्री राम साई हौशी कला मंडळ, आकें-मडगाव. उत्कृष्ट अभिनय पुरूष : प्रथम-राजेंद्र च्यारी (बाबुसो), नाटक ‘रथोत्सव’, श्री सरस्वती नाट्यामंडळ, दाग-फोंडा. द्वितीय-साईल नायक (पंकज), नाटक ‘ओ बाय’ श्री राम साई हौशी कला मंडळ, आकें-मडगाव. उत्कृष्ट अभिनय प्रशस्तीपत्रक ‘स्त्री’ समिरा वझरकर (कविता), नाटक-‘आमी ना कमी’, श्री शांतादुर्गा स्पोट्स अॅन्ड कल्चरल क्लब, नानाडो-बार्देश. स्वाती शिरसाट (चिन्नमा) नाटक-‘आमकां टायम ना’, श्री देवी सरस्वती नाट्या मंडळ, कोनर-गावणे, फोंडा. निकीता गांवस (माया) नाटक-‘देवा तूं पाव’, श्री बेळेवंश युवक समिती केरी-सत्तरी. उत्कृष्ट विनोदी भूमिका : उमेश बांदोडकर (कायतान), नाटक-‘मोग करूया मोग’, नावतकार नाट्या समाज, बांदोडा-फोंडा. उत्कृष्ट बालकलाकार : प्रथम-साईराज मडकईकर (पंजू), नाटक-‘सुंवारी’ श्री भंगिळेश्वर दहा जण समाज, वडाळवाडा-मडकई. द्वितीय-प्रथमेश सावंत (निम्मो), नाटक-‘धनयां देंवचारा’, श्री विठ्ठल मंच सांगाती कारापुर-तिस्क, साखळी.
उत्कृष्ट नाट्यासंहिता (खास स्पर्धेसाठी लिहिलेले नाटक) नाटक-‘आमकां टायम ना’, लेखक-सर्वेश एकनाथ नायक, श्री देवी सरस्वती नाट्यामंडळ, कोनर-गावणे. उत्कृष्ट पार्श्वसंगीत-सागर गांवस, नाटक-‘देवा तूं पाव’ श्री बेळेवंश युवक समिती हलिदवाडा, केरी-सत्तरी. उत्कृष्ट नेपथ्य-कुंदन च्यारी, नाटक-‘धनयां देंवचारा’, कला आविष्कार मासोर्डे-वाळपई. उत्कृष्ट वेशभूषा-पुंडलिक गांवस, नाटक-‘धनयां देंवचारा’, कला आविष्कार मासोर्डे-वाळपई. उत्कृष्ट प्रकाश योजना-तुळशिदास नाईक, नाटक-‘धनयां देंवचारा’, कला आविष्कार मासोर्डे-वाळपई. उत्कृष्ट कोंकणी नांदी-रामनाथ दामोदर… तन मन धन लीन आमी… पायांर तुज्या दामोदर… नाटक-‘शुभ मंगल धांव धांव’, रामनाथ दामोदर प्रासादीक महाजन नाट्या मंडळ, जांबावली. उत्कृष्ट आयोजक गांव – ‘ओ बाय’, श्री राम साई हौशी कला मंडळ, आकें-मडगाव. या स्पर्धेचे परीक्षण प्रसाद पागी, सूरज कोमरपंत व उदय गुडे यांनी केले होते.









