प्रतिनिधी /तिसवाडी
खोर्ली-तिसवाडी येथील पीडीए कॉलनीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित बक्षीस वितरण व विद्यार्थी गौरव सोहळा नुकताच येथील गणेशोत्सव मंडपात पार पडला. यावेळी दहावी व बारावी परीक्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. मंडळातर्फे यंदा परिसरातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील एकूण 11 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.
समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक हे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोर्ली पंचायतीचे सरपंच विरेश असोलकर हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर समील वळवईकर, अध्यक्ष कृष्णा कोपूला, सचिव प्रदीप धुळापकर, खजिनदार देवेन वळवईकर, नरेश नाईक, तातू गांवस, प्रमोद वर्मा, सुदेश नाईक आणि मान्यवर हजर होते. प्रमुख पाहुणे, कार्याध्यक्ष व इतर मान्यवरांच्याहस्ते याप्रसंगी विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्यांचे वाटपही यावेळी प्रमुख पाहीण्याच्या हस्ते करण्यात आले.
सुरूवातीला कृष्णा कोपुला यांनी स्वागत केले तर सचिव प्रदीप धुळापकर यांनी अहवाल वाचन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश शिरोडकर यांनी केले तर शेवटी नरेश नाईक यांनी आभार मानले.
फुगडी स्पर्धा
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – अखिल गोवा पातळीवरील फुगडी स्पर्धा ः प्रथम – धी पाडुरंग ब्रह्मेश्वर साखळय़ो मंडळ, आखाडा, द्वितीय – धी सातेरी कला संघ, बेतोडा. तृतीय – गोमंत भारती महिला मंडळ, करमळी. उत्तेजनार्थ- गुरूकला मंडळ, प्रियोळ व भुमीका पुरीस कला संघ, भोमा.
घुमट आरती स्पर्धा
राज्यस्तरीय घुमट आरती स्पर्धा ः प्रथम – स्वरसाई मंडळ, म्हापसा. द्वितीय – वैरागी नवदुर्गा आ. मंडळ, मडकई. तृतीय – सिद्धेश्वर नवदुर्गा आ. मंडळ, कुंडई व ब्राह्मणीदेवी आ. मंडळ, पाळी. वैयक्तिक बक्षिसे – उत्कृष्ट घुमटवादक – महागणपती, आमोणा. उत्कृष्ट गायक – दत्तात्रय, वळगे. उत्कृष्ट कासाळे-महाविष्णू, माशेल. उत्कृष्ट समेळ – शिव दामोदर मडगाव.









