वृत्तसंस्था/ लखनौ
प्रियांशू राजावत हा भारताचा एकमेव बॅडमिंटनपटू सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. महिला दुहेरीत त्रीशा जॉली व गायत्री गोपीचंद यांनीही शेवटच्या आठ फेरीमध्ये स्थान मिळविले.
अलीन्स मास्टर्स स्पर्धा जिंकणाऱ्या प्रियांशूने आपल्याच देशाच्या सतीश कुमार करुणाकरनविरुद्ध विजयी ठरला. सतीश कुमारने 18-21, 6-11 असे पिछाडीवर असताना माघार घेतल्याने प्रियांशूला आगेकूच करता आली. त्याची उपांत्यपूर्व लढत इंडोनेशियाच्या अल्वी फरहानविरुद्ध होईल.
चौथ्या मानांकित त्रीशा व गायत्री यांनी आपल्याच देशाच्या धन्या नंदकुमार व रिद्धी कौर तूर यांच्यावर 21-9, 21-5 असा विजय मिळविला. किरण जॉर्ज, अश्मिता चलिहा, उन्नती हुडा, जननी अनंतकुमार, अनुपमा उपाध्याय, रुत्विका ग•s यांचे आव्हान संपुष्टात आले.









