वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणारी भारताची महिला अॅथलीट प्रियांका गोस्वामीने स्लोव्हाकियामध्ये झालेल्या महिलांच्या 35 कि.मी. चालण्याच्या शर्यतीमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला.
स्लोव्हाकियामध्ये झालेल्या या स्पर्धेत विविध देशांचे 50 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत गोस्वामीला अकराव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने 2 तास 56 मिनिटे आणि 34 सेकंदाचा अवधी घेतला. यापूर्वी या क्रीडा प्रकारात प्रियांका गोस्वामीने 3 तास 13 मिनिटे 19 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम केला होता. पण तिने स्लोव्हाकियातील स्पर्धेत स्वत:चा विक्रम मोडीत काढला. स्लोव्हाकियातील स्पर्धेमध्ये इक्वेडोरच्या पाओला टोरेसने 2 तास 44 मिनिटे आणि 26 सेकंदाचा अवधी घेत विजेतेपद मिळविले. पेरुच्या गार्सियाने दुसरे तर पोलंडच्या डिझेबेलोने तिसरे स्थान पटकाविले.









