Bharat Jodo Yatra : मध्य प्रदेश राज्यात पोहोचलेल्या राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी- वढेरा यांनी त्यांच्या कुटुंबासहित उपस्थिती लावली. मध्यप्रदेशातील बोरगाव या ठिकाणहून सुरवात झालेल्या मोर्चात सहभागी गांधी कुटुंबातील सदस्यांची झलक पाहण्यासाठी हजारो काँग्रेस समर्थकांनी गर्दी केली होती.
प्रियंका गांधी-वढेरा, त्यांचा मुलगा रिहान आणि पती रॉबर्ट वढेरा यांनी राहूल गांधी यांच्याबरोबर मध्यप्रदेशातील बोरगाव येथून चालण्यास सुरवात केली. पुढील वर्षी राजस्थान विधानसभेच्या तयारी साठी आणि राजस्थान कॉंग्रेस अंतर्गत सुरू असलेली धुसफूस यावर मार्ग काढण्यासाठी राजस्तानमदील हा यात्रा महत्वपुर्ण मानली जात आहे.
राजस्थान नेतृत्व बदलासाठी आग्रही असलेले सचिन पायलटही या पदयात्रेत सामील झाले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जागी पायलट यांची नियुक्ती करावी यासाठी सप्टेंबरमध्ये विधीमंडळ गटाची प्रस्तावित बैठक होऊ न शकल्याने त्यांच्या हा प्रयत्न अयशस्वी झाला होता. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानमधील यात्रा संपण्यापुर्वी हा निर्णय घेतला जाईल अशी पायलट यांच्या गटाची अपेक्षा आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









