Priyanka Desai of Degve stood first in surgery department at Government Ayurveda College, Nagpur
डेगवे येथील प्रियांका नवसो देसाई ही नागपुर गव्हर्नमेट आयुर्वेद काॅलेज नागपुरच्या सर्जरी विभागात प्रथम आली. आहे प्रियंका हीचे माध्यमिक शिक्षण डेगवे माध्यमिक विद्यालयात तर बारावीचे शिक्षण सावंतवाडीच्या राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये झाले. तर सावंतवाडीच्या भाईसाहेब आयुर्वेद महाविद्यालयात बीएएमएस पदवी मिळवली .त्यानंतर नागपूरच्या गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेजात तिने एम एस साठी प्रवेश घेतला .मास्टर ऑफ सर्जरी विभागात तिने प्रथम क्रमांक पटकावला .तिच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे .डेगवेचे सरपंच राजन देसाई यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला आहे .यावेळी विकास सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण देसाई ,माजी उपसरपंच मधुकर देसाई, देवस्थान कमिटीचे मधुकर देसाई, प्रेमानंद देसाई ,शंकर देसाई, मंगलदास देसाई, विजय देसाई ,विकास केसरकर ,प्रियंका हीचे आई वडील उपस्थित होते .प्रियंका हीचे वडील सावंतवाडीच्या टोपीवाला तंत्रनिकेतन स्कूलमध्ये कार्यरत आहेत .
सावंतवाडी / प्रतिनिधी