प्रतिनिधी /पणजी
वीस वर्षांमागे केवळ एका विद्यार्थिनीला घेऊन प्रियांका राणे यांनी भरतनाटय़म्चे वर्ग सुरू केले आणि आतापर्यंत शेकडो विद्यार्थिनींनी तिथे भरतनाटय़म्चे धडे घेऊन अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या प्रारंभिकने विशारद अशा सात परीक्षा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत.
शिवाय एकूण 23 विद्यार्थिनींनी ‘अरंगेत्रम’ ही भरतनाटय़म्ची अंतिम परीक्षाही पूर्ण केलेली आहे. यावर्षीही स्वाक्षरी मुद्रस, सिया साळगांवकर, तारिणी प्रभू आणि दुर्वा शेटय़े या विद्यार्थिनी अरंगेत्रम सादर करणार आहेत.
भरतनाटय़म्बरोबरच योग, मेडिटेशन, माईंड पॉवर वगैरे गोष्टींचेही इथे प्रशिक्षण दिले जाते. प्रियांका विजय राणे यांच्या या प्रसिद्ध डान्स अकादमीचा वार्षिक कार्यक्रम यंदा शनिवार दि. 7 रोजी हनुमान नाटय़गृहात सायं. 5.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी या खास कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.









