वृत्तसंस्था / अहमदाबाद
भारताचे अ संघाचे नेतृत्व केलेल्या गुजरातचा माजी कर्णधार प्रियांक पांचाळने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असल्याचे गुजरात क्रिकेट संघटनेने सोमवारी सांगितले.
प्रियांक पांचाळने 127 प्रथमश्रेणी सामन्यात 29 शतके, 34 अर्धशतकांसह 45.18 च्या सरासरीने 8856 धावा जमविल्या होत्या. प्रियांकने 97 अ सामनेही खेळले आहेत. त्यात त्याने 3672 धावा जमल्या आहेत. ज्यामध्ये 8 शतके, 21 अर्धशतके झळकविली आहेत. 59 टी-20 सामन्यांत त्याने 1522 धावा केल्या त्यात 9 अर्धशतकांचा समावेश आहे. या फलंदाजाने 26 मे रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पांचाळने 2016-17 रणजी मोसमात 1310 धावा केल्या, 314 ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या असून बेळगावमध्ये त्याने हे त्रिशतक नोंदवले होते.









