सुरवीन चावला, प्राजक्ता कोळीही मुख्य भूमिकेत
एक नवी सुपरनॅचरल हॉरर वेबसीरिज येत असून याचे नाव ‘अंधेरा’ आहे. या सीरिजमध्ये सुरवीन चावला, प्राजक्ता कोळी, वत्सल सेठ आणि प्रिया बापट यासारखे दमदार कलाकार आहेत. फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेन्मेंटसोबत मिळून ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओने या सीरिजची निर्मिती केली आहे. या सीरिजचे पोस्टर अन् प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
अंधेरा या सीरिजचे निर्मिती गौरव देसाईने केले आहे. आमचा उद्देश घाबरविणे नसून सीरिज पाहिल्यावर प्रेक्षकांच्या मनात अस्वस्थतेची जाणीव करून देणे असल्याचे त्याने सांगितले आहे. अंधेरा ही सीरिज 14 ऑगस्टपासून स्ट्रीम होणार असल्याचे प्राइम व्हिडिओने सांगितले आहे. या सीरिजमध्ये प्रिया बापट, करणवीर मल्होत्रा, प्राजक्ता कोळी आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत आहेत, त्यांच्यासोबत वत्सल सेठ, प्रवीण डबास आणि प्रणय पचौरी हे कलाकारही दिसून येणार आहेत.
अंधेरा ही 8 एपिसोड्सची सीरिज असून याची कहाणी गौरव देसाई, राघव दार, चिंतन सरदा आणि करण अंशुमन यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शन राघव दारने केले आहे. हा शो इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा आणि सुपरनॅचरल हॉररचा दमदार मिलाप असून तो प्रेक्षकांना एक वेगळा व्हिज्युअल अनुभव मिळवून देणार आहे.









