एका प्रवाशाचा मृत्यू : 20 जखमी
वृत्तसंस्था/ मंडी
हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात पटडीघाट-कलख मार्गावर एक खासगी बस दुर्घटनाग्रस्त झाली आहे. दुर्घटनेत एका इसमाचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत इसमाचे नाव ब्रह्मलाल असून तो बसचालक असल्याचे समजते. खासगी बस मंगळवारी सकाळी कुटेहडा येथून मंडीच्या दिशेने प्रवास करत होती. ही बस 500 फूट खोल दरीत कोसळली आहे. दुर्घटनेदरम्यान बसमधून 25 जण प्रवास करत होते. यातील 20 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी मंडी बस दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. प्रारंभिक तपासात चालकाचा निष्काळजीपणा किंवा रस्त्याची खराब स्थिती कारण असावे असे मानले जात आहे. दुर्घटनेप्रकरणी विस्तृत तपास केला जात असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.









