रायगड प्रतिनिधी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या वीर गावा हद्दीत साई स्वरा ट्रॅव्हल ही खासगी बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिवार्डरला धडकली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.या बस मध्ये ४४ प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त होती.हा अपघात शनिवारी पहाटे ४:४५ च्या दरम्यान झाला.
मुंबई -गोवा महामार्गावर मालवण ते मुंबई जाणारी साई स्वरा ट्रॅव्हल ही खासगी बस (क्रमांक एम एच ०४-एफ के ३६९९) महाड तालुक्यातील वीर गाव हद्दीत शनिवारी पहाटे ४:४५ च्या सुमारास आल्या नंतर अचानक बस चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्या कडेला असलेल्या लोखंडी गार्ड जोराने धडक आणि त्या कार्डमध्येच बस अडकली. बाजूला ३० फूट खोल खड्डा होता ,जर बस पलटी झाली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती . सुदैवाने प्रवाशांना कसलीही दुखापत देखील झाली नाही. या अपघातातील सर्व प्रवासी सुखरूप असुन प्रवाशांना दुस-या बसने मार्गस्थ रवाना करण्यात आले. घटनास्थळी महाड तालुका पोलीस आणि महामार्ग वाहतूक पोलीस महाड यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि प्रवाशांना मार्गस्थ रवाना करण्यास मदत केली.