प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन रविवार दि. 18 रोजी दुपारी 3 वाजता मलप्रभा क्रीडांगण जांबोटी क्रॉस खानापूर येथे होणार असून या मैदानाची सर्व तयारी अंतिम टप्यात झाली आहे. कुस्ती शौकीनाना बसण्याची सोय करण्यात आली आहे.
या आखाड्यात प्रमुख कुस्ती बेळगावत प्रथमच महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ व भारत केसरी सोनू कुमार हरियाणा यांच्यात लढत होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी शुंभम सिदनाळे व हिमाचल केसरी पवन कुमार यांच्यात तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे यांच्यात, चौथा क्रमांकाची कुस्ती शिवय्या पुजारी व ओम माने कोल्हापूर, पाचव्या क्रमांकाची कुस्ती शिवा द•ाr व सुनील करवते, सहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंग्राळी व संजू इंगळगी, सातव्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व बस्सू जगदाळे, आठव्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील कंग्राळी व गिरीश चिवक्कबागेवाडी, नवव्या क्रमांकाची कुस्ती पवन चिक्कदिनकोप्प व श्रीनाथ ढेकोळे, दहाव्या क्रमांकाची कुस्ती निखिल कंग्राळी व सिद्धू धारवाड,
महिलांच्या कुस्त्यामध्ये शिवानी व•sबैल विरुद्ध वैष्णवी कुसमळी, ऋतुजा वडगाव विरुद्ध भक्ती मोदेकोप त्यांच्यात होणार आहे. मेंढ्याची कुस्ती पंकज चापगाव विरुद्ध रामदास काकती, महेश तीर्थकुंडे विरुद्ध काशिलिंग जमखंडी यांच्यात होणार आहे.
आकर्षक कुस्त्यामध्ये पार्थ कंग्राळी विरुद्ध संजू दावणगिरी, प्रथमेश हट्टीकर विरुद्ध सुरेश लंगोटी, रिदांत मजगाव विरुद्ध स्वराज्य सावगाव यांच्यात होणार आहे.
आखाडा समारंभाचे अध्यक्ष आमदार विठ्ठल हलगेकर राहणार आहेत. आखाड्याचे उद्घाटन जेडीएसचे नेते नासीर बागवान यांच्या हस्ते होणार आहे.
त्याशिवाय विनायक येळ्ळूर व राजू गंदीगवाड, सुमित कडोली विरुद्ध भूमिपुत्र मुतगा, हनुमंत गंदिगवाड विरुद्ध ओमकार राशिवडे, हर्ष कंग्राळीविरुद्ध उमेश शिरगुपी, सिद्धांत तीर्थकुंडे विरुद्ध केशव सांबरा आदीसह मैदानात 50 हुन अधिक कुस्त्या होणार आहेत. या कार्यक्रमाला माजी आमदार अरविंद पाटील, भाजपाचे नेते प्रमोद कोचेरी, लैला शुगर्सचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, आदीसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आखाड्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हणमंत गुरव व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.









