वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या क्रिकेट हंगामातील खेळवल्या जाणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांना सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉला हुकणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या चार महिन्यांपासून गुडघा दुखापतीमुळे पृथ्वी शॉला क्रिकेटपासून अलिप्त राहावे लागले होते. इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळताना त्याला ही दुखापत झाली होती. 5 जानेवारीपासून 2024 च्या रणजी हंगामाला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबईच्या निवड समितीने 27 संभाव्य क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली आहे. 5 जानेवारीपासून पाटणा येथे होणाऱ्या बिहारविरुद्धच्या तर त्यानंतर म्हणजे 12 जानेवारीपासून खेळविल्या जाणाऱ्या आंध्रविरुद्धच्या सामन्यात संभाव्य खेळाडूंच्या यादीत पृथ्वी शॉचे नाव गाळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सलामीचा रघुवंशी आणि दिव्यानीश सक्सेना यांनाही या यादीतून वगळण्यात आले आहे.
मुंबई संभाव्य संघ : जय बिस्ता, भुपेन लालवानी, आकाश आनंद, अमन जाफर, अजिंक्य रहाणे, सर्फराज खान, सुवेद पारकर, सागर मिश्रा, शिवम दुबे, प्रसाद पवार, हार्दिक तमोरे, मुलानी, अथर्व अंकोलेकर, आदित्य धुमाळ, कर्श कोठारी, तनुष कोटियान, हिमांशू सिंग, के. दफेदार, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, धवल कुलकर्णी, रॉयस्टन डायस, सिल्वेस्टर डिसोझा, सक्षम झा, दीपक शेट्टी, अमोल तनपुरे आणि हर्ष टन्ना.









