रिझनल स्पर्धेत 1 सुवर्ण, 2 रौप्य पदकांची कमाई
बेळगाव : बेंगळूर येथे झालेल्या 54 व्या केव्हीएस रिझनल क्रीडा स्पर्धेत जलतरण स्पर्धेमध्ये बेळगावच्या केव्ही-2 नंबरचा विद्यार्थी व स्विमर्स व अॅक्वेरेस क्लबचा खेळाडू प्रितम रेणके याची केव्ही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बेंगळुर येथील एस. सी. सेंटर येथे झालेल्या केव्ही रिझनल जलतरण स्पर्धेत बेळगावच्या केव्ही-2 चा विद्यार्थी प्रितम रेणके यांनी भाग घेतला होत्या. त्यामध्ये त्यांनी 50 मी. फ्रिस्टाईल मध्ये सुवर्ण, 100 मी. फ्रिस्टाईलमध्ये रौप्य व 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे. राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी केव्हीएस रिजनल संघात त्याची ओरिझनल संघात निवड झाली आहे. त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अजिंक्य मेंडके, अक्षय शेरेगार, नितिश कुडूचकर, गावर्धन काकतीकर, इम्रान आदींचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. तर केंद्रीय विद्यालयच्या प्राचार्य व शिक्षक वर्गांचे प्रोत्साहन मिळत आहे.









