राजापूर वार्ताहर
राजापूर तालुक्यातील प्रिंदावन येथे पावसामुळे वहाळाच्या पाण्यात वाढ झाल्याने तीन म्हैशी वाहून गेल्याची घटना घडली आहे. यापैकी एक म्हैस मृतावस्थेत आढळून आली असून अन्य दोन म्हैशींचा शोध सुरू आहे.
राजापूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे नद्या तसेच वहाळांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. अशातच प्रिंदावण येथील नथुराम बाब्या कोकरे यांच्या तीन म्हैशी वहाळाच्या पाण्यात वाहून गेल्या. यापैकी एक म्हैस वहाळातच मृतावस्थेत आढळून आली आहे. तर अन्य दोन म्हैशींचा शोध सुरू आहे. याबाबत प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.








