सिक्कीमसह उत्तर प्रदेशलाही भेट देणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 मे 2025 रोजी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. गुरुवार, 29 मे रोजी पंतप्रधान सिक्कीमला पोहोचणार असून सकाळी 11 वाजता ‘सिक्कीमॅ50’ या कार्यक्रमात सहभागी होतील. ते सिक्कीममध्ये अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करतील आणि जनतेला संबोधित करतील. त्यानंतर, पंतप्रधान पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे पोहोचणार आहेत. त्याठिकाणी पंतप्रधानांच्या उपस्थितीत दुपारी 2:15 वाजता अलीपुरद्वार आणि कूचबिहार जिह्यातील शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल. त्यानंतर, पंतप्रधान बिहारला रवाना होतील. सायंकाळी 5:45 वाजता ते पाटणा विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. दुसऱ्या दिवशी 30 मे रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान बिहारमधील करकट येथे 48,520 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. तसेच एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील. त्यानंतर, दुपारी 2:45 वाजता उत्तर प्रदेशमध्ये पोहोचून कानपूरमधील सुमारे 20,900 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्यानंतर ते उपस्थित जनतेला संबोधित करतील.









