वृत्तसंस्था/ लाहोर
पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या यजमानपदाच्या वादग्रस्त प्रकरणी पाक क्रिकेट मंडळाला (पीसीबी) पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पूर्ण आपले सहकार्य राहिल, अशी ग्वाही दिल्याची माहिती पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी दिली आहे.
या वादग्रस्त प्रकरणाची हाताळणी करताना नेहमीच पाकिस्तान स्वत:चा आदर राखेल. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे पीसीबीचे मानद प्रमुख आहेत. सदर स्पर्धा पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. पण भारताने पाकमध्ये सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता सदर स्पर्धा हायब्रिड मॉडेल पद्धतीने खेळवली जावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान या स्पर्धेतील भारताचे सामने त्रयस्त ठिकाणी खेळविण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा हायब्रिड मॉडेल प्रमाणे खेळवली जावी यासाठी आयसीसी आग्रही असल्याचे पीसीबीने म्हटले आहे.









